संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
घोषणा कोणी केली
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
आता फक्त साधा कागद पुरेसा
यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त स्वसाक्षांकित अर्ज लिहून संबंधित तहसील कार्यालयात सादर करा, आणि तुम्हाला आवश्यक ते प्रमाणपत्र मिळेल.
कोणाला होणार फायदा
दहावी आणि बारावी नंतर प्रमाणपत्रासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना
अनेक दाखले लागणाऱ्या पालकांना
शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना
त्वरित अंमलबजावणी
पूर्वी नव्या सरकारने हे शुल्क १०० वरून ५०० रुपये केले होते, मात्र यामुळे सामान्यांना आर्थिक बोजा वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला. आता नवीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
पालक आणि विद्यार्थी म्हणतात, “आता खर्च वाचणार! साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले सहज मिळतील.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…