महाराष्ट्र

दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; अमित शाह यांची भेट, विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

दिल्लीतील या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील काही नेत्यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली असून, हेच अजित पवार यांची इच्छा होती, असा दावा केला जात आहे.सध्या हा मुद्दा सार्वजनिक पातळीवर शांत असला तरी, सुनेत्रा पवार कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील बैठकीत विलिनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.

राज्यसभा राजीनामा आणि पुढील रणनीती

सुनेत्रा पवार या सक्रिय राज्य राजकारणात येण्यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून कोणाला संधी दिली जाणार, याबाबतही पक्षांतर्गत चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपाची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे संभाव्य विलिनीकरण झाल्यास सत्ताधारी भाजपाशी चर्चा अपरिहार्य मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाजपाला माहिती देणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही वरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago