महाराष्ट्र

माजी आमदार राम सातपुते यांचा ‘हत्या कट’चा गंभीर आरोप; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर बोट

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंग मोहिते पाटील यांना ‘मास्टरमाईंड’ ठरवले आहे. या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चा प्रयत्न; सातपुते यांचा दावा

राम सातपुते यांनी दावा केला की, “माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला. या कटामागे अर्जुनसिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टरमाईंड आहेत.”

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवले असून, भविष्यात आपल्या जीवाला काही धोका झाल्यास जबाबदारी कोणाची असेल याची स्पष्ट नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.

सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना, “संवैधानिक पद्धतीने लढण्याची ताकद संपल्याने असे प्रकार केले जात आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीत हरवू शकत नाही, तेव्हा अशा मार्गांचा अवलंब करणे चुकीचे आहे,” असे वक्तव्य केले.

पोलिसांचा माळशिरस तालुक्यात तळ

या आरोपांनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून माळशिरस तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी तळ ठोकला आहे. काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. पोलिसांना या कटाबाबत आधीच माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.या सर्व घडामोडींमुळे माळशिरससह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांचाही आरोप

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनीही काल अशाच स्वरूपाचा आरोप केला होता. माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. “राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता,” असा दावा त्यांनी केला.मोहिते पाटील यांनी गोरेंना ‘गुंड’ म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर गोरे यांनी प्रत्युत्तर देताना “मोहिते हेच सर्वात मोठे गुंड आहेत,” असा पलटवार केला.

पुढे काय?

गंभीर आरोप-प्रत्यारोपांमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पोलिसांकडून सुरू असलेली चौकशी आणि राजकीय नेत्यांची आक्रमक भूमिका यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आरोपांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago