महाराष्ट्र

पुण्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला

पुणे: भारतीय संविधानाच्या बळावर विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेला भारत जगातील सर्वात मोठा व यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले.

पोलीस संचलन मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच इतर पोलीस अधिकारी, नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण वंदन केले. तसेच गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही अभिवादन केले.

शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, आरोग्य, पायाभूत सुविधा, आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून, हे शहर देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती आणि धार्मिक स्वातंत्र्य दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे, असे ते म्हणाले.

सोहळ्यात विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एसआरपीएफ गट क्र. १ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे यांचा समावेश होता.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘स्वच्छ पुणे संकल्प-2026’ प्रचार रथाचे उद्घाटन केले. या उपक्रमांतर्गत कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

9 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

15 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

16 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

16 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

16 तास ago