महाराष्ट्र

पिडीत महिलेने सभागृहावर विश्वास ठेवावा आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या प्रकरणात पीडित महिलेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न होणार? जर ती पीडित महिला हे सगळ पाहत असेल तर त्यांनी सभागृहावर विश्वास ठेवायला हवा, अशी विनंती डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी उपसभापती यांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

या मुद्द्यावर बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणारा आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं- मुली आणि बाकीची कुटुंब असते. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना बंधन सर्व माध्यमांनी गंभीरतेने पाळावे.

पोलिसांचा तपास होईल त्यावेळी मिळणारी माहिती देखील माध्यमांनी काही मर्यादा पाळावी. पेनड्राईव्ह मला मिळाला आहे. त्यावरती आवश्यक कार्यवाही केली जाईल. हा व्हिडिओ संबंधीत चौकशी अधिकारी यांचेकडे पाठवला जाईल. या मधील महिलेची तक्रार आवश्यक आहे, असे मत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

सभागृहातील चर्चा संबंधीत महिला मध्यामामधून ऐकत असेल तर तिला याद्वारे आश्वस्थ करण्यात येते की तिने सभागृहावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा आपण सभागृहात बोलतो ते पीडीत महिला ऐकतात. ते ऐकून अनेक पीडित महिलांनी मला, फडणवीसांना संपर्क केला आहे. लोकांना अजूनही सभागृहावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. यासाठी सर्वांनी हा महिलांचा या सभाग्रहावरील विश्वास दृढ होईल असे वर्तन ठेवणे आवश्यक आहे. या प्रकारांना मध्ये गृहमंत्र्यांनी जी चौकशी जाहीर केली आहे त्यामध्ये नक्कीच सत्य बाहेर येईल, असा विश्वास ही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

6 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

6 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

10 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

10 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

10 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

10 तास ago