महाराष्ट्र

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

पुणे: जि. प. प्राथमिक शाळा, डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथे ५ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच चंद्रकांतबापू आव्हाळे पाटील, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्ञानेश्वरी उद्योगसमूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन काकासाहेब रामराव सातव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक आप्पा सातव पाटील, संजय सातव पाटील व कांताराम सातव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या अर्चनाताई मुरकुटे, आव्हाळवाडीचे माजी सरपंच रामदास आबा सातव पाटील, माजी उपसरपंच उषाताई सातव पाटील, नटराज डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा नटराज सातव पाटील, उद्योजक राहुल सातव पाटील, दशरथ सातव पाटील, नारायण सातव पाटील, संभाजी सातव पाटील, ह.भ.प. शरदमहाराज सातव पाटील, उद्योजक विकास सातव पाटील, बैलगाडा मालक नितीन सातव पाटील, गौरव सातव पाटील, हवेली शिक्षक सोसायटीचे चेअरमन विजय काळे सर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष विलास थोरात सर, उद्योजक गणेशशेट अमृत सातव पाटील, ग्रामपंचायत सदस्या सविताताई सातव पाटील, सारिकाताई सातव पाटील, सुरेश आबा सातव पाटील, मिलिंद सातव पाटील तसेच इंजिनिअर सुनील थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी काढण्याचे काम सारिका काळपूंड, वर्षा थोरात मॅडम व दिपाली जांभळे मॅडम यांनी केले. शाळेतील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर इयत्ता १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” ही थीम होय. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यक्रमांना प्रेक्षकांनी “वन्स मोअर” म्हणत विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला.

सायंकाळी ५.३० वाजता सुरू झालेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रात्री ९.३० वाजेपर्यंत रंगला. त्यानंतर सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व पाहुण्यांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी मोठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब टेमगिरे सर, अपर्णा थोरात मॅडम व मछिंद्रनाना सातव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता येद्रे व शिक्षक लक्ष्मण साकोरे सर यांनी केले.

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

डोमखेलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरविला आठवडी बाजार…

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago