महाराष्ट्र

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे; नीलम गोऱ्हे

मुंबई: विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले.

लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही समिती 19 सदस्यांची असेल. या समितीची नावे आजच निश्चित करण्यात येतील असे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘या विषयी संयुक्त चिकित्सा समितीसाठी आजच सर्व पक्षीय सदस्यांची नावे निश्चित केली जातील.’ या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. दिलीप वळसे पाटील, आ. सचिन अहिर, आ.अभिजीत वंजारी, आ. विलास पोतनीस, आ. प्रवीण दरेकर, आ. एकनाथ खडसे, आ. जयंत पाटील,आ. कपिल पाटील, प्रधान सचिव नगर विकास आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

3 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

3 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

3 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

3 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

4 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

4 तास ago