शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या नोंदणी करण्याची प्रक्रिया

20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

उद्या म्हणजेच 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून उद्यापासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. _म्हणजे लवकरच आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात.

पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया (Step-by-Step Guide):

१) अधिकृत वेबसाइटला भेट द्या: पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://www.edustaff.maharashtra.gov.in

२) नवीन खाते तयार करा (Register): होमपेजवर “नोंदणी करा” किंवा “Register” हा पर्याय निवडा. तुमचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, आणि वैध ईमेल आयडी भरा. पासवर्ड तयार करा आणि तो सुरक्षित ठेवा. तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करण्यासाठी आलेला ओटीपी (OTP) भरा.

३) लॉगिन करा: नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडेन्शियल्सचा (ईमेल/मोबाइल आणि पासवर्ड) वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.

४) प्रोफाईल भरा: माझी प्रोफाईल” किंवा “My Profile” या विभागात जा. आवश्यक माहिती भरा, जसे की शैक्षणिक पात्रता (उदा. बीएड, डीएड इत्यादी). अनुभव (जर असेल तर). वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता, इ.). आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.

५) शिक्षक भरतीसाठी अर्ज भरा: प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, “शिक्षक भरती अर्ज” किंवा “Recruitment Application” या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा. इतर आवश्यक तपशील भरा.

६) फी भरून अर्ज सबमिट करा: अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करा. यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा.

७) अर्जाची प्रिंटआउट घ्या: अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा.

महत्त्वाच्या सूचना

फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सबमिट करा.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असतील याची काळजी घ्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

6 तास ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

9 तास ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

12 तास ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

12 तास ago

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…

16 तास ago

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

1 दिवस ago