महाराष्ट्र

पार्ले-जीचा जन्मस्थान असलेली विलेपार्ले फॅक्टरी जमीनदोस्त होणार

३,९६१ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प; पार्लेकरांसाठी भावनिक निरोप

मुंबई: अगदी शहरांपासून गावातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलेलं, पिढ्यान्‌पिढ्या चहाच्या कपासोबत नातं जपणारं पार्ले-जी बिस्कीट…या बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला, ती ऐतिहासिक जागा आता इतिहासजमा होणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले-जी बिस्किट फॅक्टरीच्या जागेवर भव्य व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असून, लवकरच या इमारतीचं पाडकाम सुरू होणार आहे.

गेल्या अनेक दशकांपासून ही फॅक्टरी केवळ उत्पादन केंद्र नव्हती, तर विलेपार्लेकरांच्या ओळखीचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग होती. विलेपार्ले स्टेशनवर उतरल्यावर वाऱ्यासोबत दरवळणारा बिस्किटांचा गोड सुगंध आणि “पार्ले बिस्किट फॅक्टरी” हा परिसराचा लॅण्डमार्क म्हणून ओळखला जात होता.

१३.५४ एकरवरील ऐतिहासिक आवाराचा कायापालट

विलेपार्ले येथील १३.५४ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्ले-जी फॅक्टरीच्या जागेला राज्य पर्यावरण प्राधिकरणाने व्यावसायिक पुनर्विकासासाठी मंजुरी दिली आहे.या प्रकल्पासाठी तब्बल ३,९६१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, या ठिकाणी अनेक व्यावसायिक इमारती, अत्याधुनिक कार्यालयीन संकुले, हायटेक पार्किंग टॉवर्स आणि आधुनिक नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत.विलेपार्ले हा परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्यामुळे प्रस्तावित इमारतींची उंची २८ ते ३१ मीटर इतकी मर्यादित ठेवण्यात येणार आहे.

निसर्गावरही परिणाम; १,८५१ नवीन झाडे लावण्याचं आश्वासन

पुनर्विकास प्रक्रियेत केवळ इमारतींचाच नाही, तर परिसरातील निसर्गाचाही मोठा बदल होणार आहे.या आवारात सध्या ५०८ मोठी झाडे आहेत. यापैकी १२९ झाडे तोडण्यात येणार, तर ६८ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी विकासकाने १,८५१ नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये १,२०० झाडांची मियावाकी जंगल योजना राबवली जाणार असून, त्यामुळे भविष्यात हरित क्षेत्र वाढवण्याचा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेकडून मंजुरी; पाडकाम लवकरच

मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्पाला Commencement Certificate (काम सुरू करण्याची परवानगी) मिळाल्यामुळे आता लवकरच फॅक्टरीच्या पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.एकूण १.९० लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर होणाऱ्या या नव्या बांधकामामुळे विलेपार्लेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.

पार्लेकरांसाठी भावनिक क्षण

स्थानिक रहिवाशांसाठी ही फॅक्टरी केवळ एक इमारत नव्हती, तर त्यांच्या बालपणाच्या, कामगारांच्या आठवणींचा आणि परिसराच्या ओळखीचा भाग होती.शाळेत जाण्याआधी दूध-पार्ले-जी, आजारपणातला पहिला घास, प्रवासातील सोबती अशा असंख्य आठवणी या फॅक्टरीशी जोडलेल्या आहेत.इमारत जरी जमीनदोस्त होत असली, तरी पार्ले-जीने भारतीयांच्या आयुष्यात निर्माण केलेल्या आठवणी मात्र कायम राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago