तरनतारन (पंजाब): दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पंजाबमधील तरनतारन शहरात खळबळ उडाली आहे. दानिका (९) आणि आरव (६) या भावंडांचे रविवारी सकाळी त्यांच्या घरातील बिछान्यावर मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोघांनी फास्ट फूड खाल्ले होते. मुलांच्या हट्टामुळे वडील विशाल कुमार यांनी घराजवळील फास्ट फूड स्टॉलवरून सोया चाप आणि मोमोज मागवले होते. फास्ट फूड खाल्ल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांकडून आणलेले औषध दिले. औषध घेतल्यानंतर दोन्ही मुले झोपली.
रविवारी सकाळी कुटुंबीयांनी मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी दोघांचेही मृत्यू झाल्याचे लक्षात आले. मुलांचे मृतदेह काळे-निळे पडलेले असल्याचेही आढळून आले.
या घटनेनंतर पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात पोलिसांनी काही संशय व्यक्त केला आहे. मुलांनी जेवलेले अन्नच कारण असते तर त्यांची आई नेहा यांनी तेच अन्न खाल्ले असूनही त्यांची प्रकृती कशी स्थिर आहे, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे विषप्रयोग किंवा श्वास कोंडला गेल्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, विशाल कुमार हे गेल्या २० वर्षांपासून त्या परिसरात राहत असून ते फळांचा रस विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना निखिल नावाचा मुलगा आहे, जो सध्या सिंगापूरमध्ये राहतो. सुमारे ११ वर्षांपूर्वी विशाल यांनी नेहा यांच्याशी दुसरे लग्न केले होते. या दांपत्याला दानिका आणि आरव अशी दोन मुले होती. अलीकडे विशाल यांचा व्यवसाय मंदावल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…