चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाहणी दरम्यान दिली. या पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिक्षक यांच्या समोरच निवासी डॉक्टरांनी अंबादास दानवे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला. एमआरआय मशीन असून ती अजून कार्यरत नाही, ऑपरेशन विभागात मूलभूत सुविधा नाही, रेडीओलॉजी विभागात कर्मचारी नाही तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी समस्या निवासी डॉक्टरांनी दानवे यांच्यासमोर मांडल्या.
केपीसीएल कंपनीकडून विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच पुर्नवसनाचा मुद्दा, चंद्रपूर जिल्हा मेडिकल महाविद्यालयातील असुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. केपीसीएल कंपनीने शेतकऱ्यांची काही जमीन वाटाघाटी करुन खासगीरित्या घेतली तर काही जमीन सरकारकडून घेतली. मात्र शेतकऱ्यांची जमीन घेऊनही त्यांच्या नावांची यादी नाही असे सांगून कंपनी दुतोंडी भूमिका निभावत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली. शेतकऱ्यांच वेळेत पुर्नवसन न केल्यास वैधानिक मार्गाने पावले उचलून येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असा इशारा दानवे यांनी केपीसीएल कंपनीला दिला.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल काशीकर, जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, आशिष कावटवार विरोधी पक्षनेते नगरपरिषद पोंभुर्णा, सरपंच प्रशांत कोल्हे वाहनगाव युवासेना जिल्हाध्यक्ष समनव्यक विनय धोबे व पदाधिकारी उपस्थित होते.
लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…
मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…