महाराष्ट्र

त्या रेशन कार्ड धारकांचे रेशनवरील धान्य कायमचे बंद होणार

कोणाला बसणार सरकारच्या नव्या निर्णयाचा फटका

मुंबई: रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण की काही रेशन कार्ड धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. यामुळे जर तुम्हीही शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी अधिक खास राहणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशनवरील धान्याचा लाभ घेत नाहीत त्यांचा लाभ सरकारकडून बंद केला जात आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक सहा महिन्यांनी यादी पाठवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ही यादी जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना पाठवली जात असून सदर शिधापत्रिका धारकांचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक शिधापत्रिका धारकांचा लाभ बंद

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक रेशन कार्ड धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ गेल्या काही महिन्यांच्या काळात बंद करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.

जिल्ह्यातील 1600 शिधापत्रिका धारकांची यादी शासनाकडून नुकतीच पाठवण्यात आली असून या संबंधित शिधापत्रिका धारकांचा लाभ बंद करण्यात आला आहे. याआधी देखील शासनाने साडेतीन हजार शिधापत्रिकाधारकांची यादी पाठवली होती.

म्हणजे गेल्या काही महिन्यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील सलग सहा महिने रेशन न घेणाऱ्या पाच हजाराहून अधिक रेशन कार्ड धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आता आपण शिधापत्रिका धारकांसाठी तयार करण्यात आलेला हा नियम नेमका कसा आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केव्हा बंद केला जातो रेशनवरील धान्याचा लाभ

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारने लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश काढला आहे. हा आदेश ज्या लोकांना रेशन वरील धान्याची गरज नाही अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा लाभ बंद करण्यासाठी आहे.

या सरकारच्या नव्या निर्णयानुसार जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशनच्या धान्याचा लाभ घेत नाहीत त्यांचे रेशन कार्ड ऍक्टिव्ह म्हणजेच सक्रिय राहत नाही. दरम्यान अशा ऍक्टिव्ह नसणाऱ्या रेशन कार्ड धारकांची त्यापुढील तीन महिन्यांत पडताळणी केली जात असते. म्हणजे लाभार्थी त्याच पत्त्यावर आहे की नाही, त्याला धान्याची खरंच गरज आहे की नाही, त्याचे उत्पन्न वाढले आहे की नाही अशा सगळ्या बाबींची शासनाकडून काटेकोर पडताळणी होते आणि त्यानंतर मग सदरील रेशन कार्ड धारकाचे लाभ बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. यासाठी शासनाकडून संबंधितांची यादी तयार केली जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago