महाराष्ट्र

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष सोशल मीडिया रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील युवकांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांनी आपले विचार प्रभावीपणे मांडावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिली.

स्पर्धेसाठी बेरोजगारी, पेपरफुटी आणि महागाई हे तीन विषय निश्चित करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांनी यापैकी कोणत्याही एका विषयावर रील तयार करून आपले मत मांडायचे आहे.

स्पर्धकांनी आपली रील १७ जून २०२६ पर्यंत इन्स्टाग्रामवर पोस्ट करावी. रील पोस्ट करताना @mumbaiiyc या अधिकृत हँडलला टॅग करणे तसेच #ReelSeRealTalk हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. रीलमधील आवाज आणि व्हिडिओ स्पष्ट असावा तसेच कोणतीही आक्षेपार्ह, अश्लील किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये, असे आयोजकांनी नमूद केले आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट तीन रील्सना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील बेरोजगारी, वाढती महागाई आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रश्नांवर युवकांनी आपली भूमिका मांडावी, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०८२२९८०४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago