मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पीर पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री मंगलप्रभात लोढा, श्री दिलीप कांबळे, श्री मधु चव्हाण, ॲड.श्री उज्ज्वल निकम, श्री पाशा पटेल, श्री राजेश पांडे, डॉ. भारती पवार, श्रीमती नीता केळकर, श्रीमती माधवी नाईक, श्री सुरेश हावरें, श्री लद्धाराम नागवानी, , श्री लक्ष्मण सावजी, श्रीमती स्मीता वाघ, श्री अमोल जाधव, श्री अनिल सोले, श्री दयानंद तिवारी, श्री क्रण पातुरकर, श्री मिलिंद तुळसकर आदी प्रमुख नेते सहभागी होते.
या बैठकीत उपस्थित नेत्यांनी वचननाम्यात समाविष्ट करण्याच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. आजवर मतदारांकडून व विविध विषयातील तज्ञांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवरही सांगोपांग चर्चा झाली. भाजपाचा हा वचननामा सामाजिक जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा, सर्व घटकांचे समाधान करणारा असा सर्वसमावेशक असावा यासाठी वचननामा समिती प्रयत्नशील आहे असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
लोकनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची प्रत्येक नागरिकाला ही संधी असून नागरिकांकजून या वचननाम्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आपल्या सूचना आपण visionformaharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा पत्राद्वारे अथवा 9004617157 या व्हॉट्सअप वर लवकरात लवकर पाठवाव्यात अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या नागरिकांना केली आहे.
तर भाजपा प्रदेश कार्यालयातही वचननाम्यासंदर्भात नागरिकांच्या सूचना स्वीकारण्याकरता एक पेटी ठेवण्यात आली आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…