राजकीय

अमित शाह, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी…

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांचे: खासदार सुप्रिया सुळे

मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत असल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे. भाजपासोबत युती करुन सरकार चालवणार्‍या लोकांचे हे वर्तन आणि प्रतिक्रियांवर तुम्ही कारवाई करा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना शिंदे गटाच्या लोकांकडून असलेला धोका लक्षात घेता झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago