शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टीका
शिक्रापूर (शेरखान शेख): नवीन वषार्ची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने तसेच कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करत केली असून मी करणी सेने सारख्या चिल्लर लोकांवर काही बोलणार नाही आणि याठिकाणी शासनाच्या वतीने कोणी येईल की नाही याचा विचार करत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी करणी सेनेवर बोलण्याचे त्यांनी टाळले पण पण यांचे जे बोलविके धनी आहेत त्या भाजपा मधल्या कोणत्याही प्रतिनिधीने हे बोलून दाखवले मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देवू असे सांगत सत्तेतील कोणताही नेता येथे येणे अपेक्षित नाही कारण सरकारच पेशवाईचे असुन ज्या पेशवाईचा पाढाव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक असल्याचे अंधारे यांनी सांगत मला गेली 4 वर्षे याठिकाणी मज्जाव करण्यात येत होता. मात्र यावर्षी मज्जाव केला नसल्याने याठिकाणी नतमस्तक होता आले.
याठिकाणी येण्यासाठी बसच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असताना सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी लोकांना येण्यापासुन मज्जाव तर प्रशासन करत नाही ना असा सवाल यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. दरम्यान अंधारे यांचा सदर ठिकाणी विजयस्तंभाची प्रतिकृती देत सन्मान करण्यात आला.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…