dilip-walse-patil

विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : आंबेगाव विधानसभा निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या १५०० मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटील चांगलीच फाईट दिली. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील यांना निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून मंचर येथील आभार दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना चिमटे काढले आहेत.

विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालोय पण सगळीकडे लाजत लाजत फिरतोय. मात्र विरोधातले (शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम) पराभूत होऊनही गावच्या पाटलासारखे फिरतायेत. मागील आठवड्यात उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यानंतर, १५०० हजाराने निवडून आलो म्हणून मंत्री करा, असे पक्ष नेतृत्वाला सांगू का? अशी विचारणा करीत दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.

हसन मुश्रीफ वगळता जुन्या पिढीतील नेत्यांना दूर सारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीतील नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तसेच अडीच वर्षांनंतर सध्याच्या मंत्र्यांना बदलून नव्या नेत्यांना त्यांनी मंत्रिपदावर काम करण्याची जबाबदारी दिली. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद आबा पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक अशा नेत्यांना अजित पवार यांनी मंत्री करून महत्वाची खाती दिली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि दिलीप वळसे पाटील मंत्री नाहीत अथवा महत्त्वाचे पद नाही, असे प्रथमच घडत आहे.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला आहे. आपला विजय झाला आहे. आता विधानसभेच्या चर्चांना ब्रेक देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामांना लागा, अशा सूचना वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर…

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…