मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘टीस’ या संस्थेच्या माध्यमातून राज्यसरकार करणार आहे. मुळात देशपातळीवर मुस्लिम समाजाबद्दल भाजपची काय भूमिका आहे हे वेगळे सांगायला नको असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
सबका साथ, सबका विकास हा मंत्र मोदींनी दिला मात्र २०१४ नंतर भाजप राजवटीत मुस्लिम समाजाबाबत काय काय घडलं हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता राज्यसरकार हे सर्वेक्षण करत आहे मात्र राज्यसरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्यांचे स्वागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…