राजकीय

महायुतीच्या धडाकेबाज योजनांमुळे विरोधकांची तोंड काळवंडली…

भंडारा: महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण देणारे आहोत विरोधक घेणारे होते. पूर्वी सरकार धानाला १५००० रुपये बोनस द्यायचे, महायुतीने बोनस २०००० पर्यंत वाढवला होता, आता पुन्हा सरकार आले की इथल्या शेतकऱ्यांच्या धानाला २५००० रुपये बोनस देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. भंडारा येथे महायुतीचे उमदेवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

महायुतीच्या धडाकेबाज योजनांमुळे विरोधकांची तोंड काळवंडली आहेत, आपल्या सगळ्या योजना त्यांनी ढापल्या, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. एकीकडे लाडकी बहिण योजनेला विरोध करायचा आणि दुसरीकडे वचननाम्यात त्याच योजनांचा समावेश करायचा अशा विरोधकांना लाडक्या बहिणी निवडणुकीत नक्की जोडा दाखवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणून दाखवले. जनतेने युतीला निवडून दिले, मात्र त्यांनी मतदारांशी बेईमानी केली, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. सत्ता सोडण्याची हिम्मत आम्ही दाखवली. बाळासाहेबांचे विचार मोडले-तोडले जात होते. ‘उबाठा’ने काँग्रेसकडे गहाण टाकलेला पक्ष सोडवला. आता शिवसेना पक्ष हा नेत्यांचा नाही तर सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. जो काम करणार तो पुढे जाणार, असे ते म्हणाले.

अडीच वर्षात महाविकास आघाडीने प्रकल्प बंद पाडले. समृद्धी मार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो कारशेड, मराठवाडा वॉटर बंद, विदर्भातील सिंचन योजना, जलयुक्त शिवार अशा योजना त्यांनी बंद पाडल्या. पण जसे आपले सरकार आले तसे स्पीडब्रेकर काढून टाकले. महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे. एकदा दिलेला शब्द मागे घेत नाही.विकासाची गाडी वेगाने धावायला लागली. १२४ सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली. मविआ सरकारच्या काळात केवळ चार प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते

बाळापूर येथील महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर घणाघाती टीका केली. काहीजण शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला असे लहान मुलांसारखे काय रडताय. तुम्ही काय झोपले होते का, धनुष्यबाण उचलायला मनगटामध्ये ताकद लागते. सत्ता सोडायला हिंमत लागते ती माझ्यासह ७ ते ८ मंत्री आणि ५० आमदारांनी दाखवली. सत्ता सोडली आणि शिवसेना वाचवली, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago