राजकीय

केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करत…

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात

रत्नागिरी: ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं अशी घणाघाती टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप कशाप्रकारे जोरजबरदस्ती करतं, दादागिरी करतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी आहे. जोरजबरदस्ती करून भाजपने स्वतःचे सरकारला बसवले खरे पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या चिंधड्या केल्या.

मी मागेच एकदा म्हणालो होतो की जे लोक फुटून तिकडे गेले होते, त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना फार आधीपासूनच ब्लॅकमेल केलं जायचं. वरील विधानाने त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे असेही ते म्हणाले

ही विधानसभा निवडणूक भाजपसारख्या असंवेदनशील आणि संधीसाधू पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची नामी संधी आहे. भाजपची दादागिरी संपवण्याची, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वाचवण्याची, महाराष्ट्र धर्म रक्षणाची हीच ती वेळ असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago