राजकीय

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार; आदित्य ठाकरे

मुंबई: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता ?” हे विचारा असं आवाहन केल आहे.

महाराष्ट्र देशाला आजवर दिशा देत आल आहे. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, सुपीक जमीन आहे. कुशल तरुण आहेत. पण या राज्यातून प्रकल्प राज्यातून परत जाताय. पर राज्यात प्रकल्प जाण्याचं वाईट वाटत नाही, तर आपल्या राज्यातून प्रकल्प इथे न थांबता परराज्यात जातायत त्याचं वाईट वाटतय. महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही तर देश मागे जाईल. पण महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकलेत असं म्हणत स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना करत जनतेला एकत्र येण्याचं आवाहन केल आहे.

गृहमंत्र्यांना आजवर एवढं हतबल पाहिलं नाही

राज्यातील प्रकल्प गेले तरी मोठा प्रकल्प राज्यात आणू म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते आणू शकले नाहीत . त्यावरून आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढं हतबल आजवर कधीही पाहिलं नाही . आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही, असं म्हणत संभाजीनगर इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

गद्दार आमदार म्हणतात चुन चुन के मारेंगे, खरं तर मागे पाठीत वार करणारे पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे. तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करतं पण कारवाही होत नाही. तर काही मंत्री संवीधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करतं , पण तरीही कोणितीही कारवाही न करता केवळ समज दिली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago