राजकीय

रोहित पवार यांना तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिले नाही; कारण…

शिक्रापूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु झाली असून, तळेगाव ढमढेरे येथे आली असता पुढाऱ्यांना नो एन्ट्री असल्याने रोहित पवार यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थांबू दिले नाही.

रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अन्नत्याग केला असल्याने मराठा समाज या संघर्ष यात्रेत सहभागी झाला, त्यांनी गावाच्या वेशीपर्यंत ही यात्रा सोडली. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने यावेळी संवेदनशीलता दाखवल्याचे दिसून आले.

रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज ही यात्रा सकाळी तळेगाव ढमढेरेमध्ये पोहचली होती. त्यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या या यात्रेला संवेदनशीलता दाखवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच तळेगाव ढमढेरे येथेही पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची सभा किंवा गावात पुढाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही आहे. रोहित पवार यांची ही यात्रा गावात आली होती, मात्र त्यांना थांबण्यास नकार दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा शुक्रवारीही शिरूर तालुक्यातच असणार आहे, त्या दरम्यानही त्यांनी अन्नत्यागाचा निर्णय घेतला आहे. सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.

शिरूर तालुक्यात सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान!

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

शिरूर महसूल विभागाचे अधिकारी भ्रष्टाचार करून ही मोकाट…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

10 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago