snehal-nichit-wadner

शिरूर तालुक्यात सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान!

शिरूर तालुका

वडनेरच्या निचित पाटलांचा अनोखा विक्रम
शिरूर (अरूणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथील स्नेहल विशाल निचित हीची नुकतीच वडनेर गावच्या पोलिस पाटील म्हणून निवड झाली आहे. सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान झाल्याने अनोखा विक्रम झाला आहे.

शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेऊन पुढेही निचित कुटुंबाने हुशारीच्या जोरावर परंपरा कायम ठेवली आहे. पोलिस पाटील हे मानाचे पद आहे आणि या पदाला नेहमीच योग्य न्याय देण्याच काम या कुंटुंबाने केलं आहे. खर तर सातवी पिढी पाटील पदावर विराजमान होणे हे या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. रावजी पाटील, तुकाराम पाटील, नाना पाटील, कृष्णा पाटील, दत्तात्रय पाटील, नारायण पाटील आणि आता स्नेहल पाटील यांनी कुटुंबाच्या डोक्यावर मानाचा तुरा लावण्याचं काम केलं आहे.

स्नेहल निचित पाटील यांची निवड परिक्षेतून झाली. ८० पैकी ७४ गुण मिळवून त्या तालुक्यात प्रथम आल्या. त्यांनी BE. Computer पर्यंत शिक्षण घेतले असून एक उच्च विद्या विभूषित पोलिस पाटील स्नेहलच्या रुपाने वडनेर ग्रामस्थांना लाभल्या आहे. हे तर खर ग्रामस्थांच्या दृष्टीने ही कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे. म्हणून सर्व स्तरातून नूतन पोलिस पाटीलांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांचे सासरे नारायण निचित हे पोलिस पाटील पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी शासनाच्या नियमानुसार परिक्षा घेऊन हे पद भरले गेले. आरक्षणानुसार वडनेर गावचे आरक्षण हे सर्व साधारण महिला असे निघाले होते. त्यासाठी गावातील अनेक महिलांनी अर्ज करून परिक्षा दिली होती. परंतु त्यात सर्वाधिक गुण मिळवून पोलिस पाटील पदाचा मुकूट त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर प्राप्त केला.

पोलिस पाटील या पदाला न्याय देण्याचे काम निश्चित पणे करुन सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. पोलिस बांधवांना योग्य सहकार्य करुन गुन्हेगारी व बेकायदेशीर कामाविरोधात मदत करेल असेही त्यांनी सांगितले.

स्नेहल विशाल निचित यांच्या या यशाबद्दल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, भिमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरुर तालुका देखरेख संघाचे चेअरमन बाबाजीशेठ निचित, घोडगंगा कारखान्याचे मा. संचालक राजेंद्रदादा गावडे, शिरुर पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सदस्या अरुणाताई घोडे, सरपंच दामुआण्णा घोडे, सरपंच नवनाथ निचित, उपसरपंच विक्रम निचित, नवनाथ राऊत, डी. एम निचित, पाडुरंग निचित गुरूजी इतर अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी नूतन पोलिस पाटीलांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…