police-patil

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

मुख्य बातम्या

शिरूर (संपत कारकूड) : शिरूर तालुक्यातील १७ गावातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदावर उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग पुणे यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ ठिकाणी पुरुष तर ६ ठिकाणी महिलांना पोलिस पाटील होण्याचा मान मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने ३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीरनामा काढून तालुक्यातील २३ गावांचे पोलिस पाटील पदाचे रिक्त पदाबाबतचे आरक्षण घोषित केले होते. त्यापैकी १७ गावांतील इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. अर्जाच्या छाननीनंतर १७४ उमेदवार परीक्षा पास होऊन मुलाखतीला पात्र ठरले होते. शिरूरच्या विद्याधाम येथे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० मार्कची परीक्षा तर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी २० मार्कची तोंडी मुलाखत घेतली होती.

पोलिस पाटील पदासाठी पिंपळे जगताप, आपटी, गणेगाव खालसा, डिंग्रजवाडी, सविंदणे, तांदळी, पिंपळसुटी आणि काठापूर या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली होती. यातील तांदळीमध्ये १ जागेसाठी १४ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले होते. अत्यंत नियोजनपूर्वक अर्ज वाटप ते निवड होईपर्यंत पुणे उपविभाग व शिरूर महसूल प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. राजकीय शिफारशीला कोणतीही संधी या निवड प्रक्रियांमध्ये दिली नाही. शिरूर पोलिस यांनीही चोख बंदोबस्त ठेऊन निवडप्रक्रिया पार पाडण्यास मोलाची मदत केली.

आरक्षणामुळे ६ महिलांना पाटील होण्याची संधी…
शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप, सादलगाव, वडनेर खुर्द, पिंपळसुटी, सविंदणे, वाघाळे या ६ गावात महिला पोलिस पाटील झाल्या आहेत. आरक्षणामुळे या गावात प्रथमच महिला पोलिस पाटील होण्याचा मान त्यानां मिळाला आहे. या सर्व गावात आनंद व्यक्त केला जात आहे.

सादलगावात पत्रकाराच्या मुलीला पाटीलकी…
सादलगाव येथील www.shirurtaluka.com चे पत्रकार संपत कारकूड यांची मुलगी दिव्या संपत कारकूड यांना पोलिस पाटील पदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या गावात प्रथमच महिला पोलिस पाटील हा मान त्यांना मिळाला आहे.

आरक्षनामुळेच संधी मिळाली…
शिरूर तालुक्यातील शासनाने दिलेल्या आरक्षणामुळेच मला हि संधी मिळत आहे. अन्यथा अशी संधी मिळणे अवघड आहे. यासाठी मी शासनाचे आभार मानत आहे, अशी प्रतिक्रिया दिव्या कारकूड यांनी व्यक्त केली.

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

रांजणगाव MIDC मध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी घेतल्याने तीन जणांवर गुन्हे दाखल