शिरुर तालुक्यात सात जणांच्या टोळक्याचा एका तरुणावर हल्ला

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवार (दि २३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पुर्व वैमनस्याच्या कारणावरुन एका तरुणावर तब्बल सात जणांच्या टोळक्याने थेट हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली.

याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात संकेत सुरेश गुजर (वय २१) याने फिर्याद दाखल केली आहे. पुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन अजय पोपट वाळके याच्यासोबत आलेल्या ऋषीकेश रविंद्र देशमुख, मयुर रंगनाथ लंघे, वैभव बबन वाळके, प्रविण देशमुख(पुर्ण नाव माहीत नाही), रोहन काळे (पुर्ण नाव माहीत नाही), ऋषीकेश देशमुख (पुर्ण नाव माहीत नाही) या सर्वांनी पेट्रोल पंपावर बेकायदेशीरपणे गर्दी जमवत दहशत निर्माण केली. हे सर्वजण फिर्यादीवर तुटून पडले आणि तोंडावर लाथाबुक्क्यानी तसेच दोन लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात फिर्यादीला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. या प्रकरणी सातही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार दिपक पवार हे करत आहेत. करडे परिसरात या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago