शिरूर तालुका

कुंड येथील रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे): वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवार (दि. ८) सायंकाळी पावणे 5 च्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता मात्र तपास लागला नाही.

पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा, जि. वाशिम) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली. पाण्याच्या प्रवाहात काही अंतर वाहत गेली. मात्र तेथील खडकामध्ये रांजणाच्या आकाराचे मोठे मोठे खड्डे असल्याने ती कदाचित त्यामध्ये अडकली असावी असा प्रत्यक्ष दर्शींचा अंदाज आहे.

महीला पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली.

सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेतली व महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. औताडे यांना या रांजण खळगे परिसराचा अंदाज न आल्याने त्यांनी पाण्यात उडी मारली असावी. त्यांना दुखापत झाली असून त्यांचाही जीव थोडक्यात बचावला आहे, असे तेथील प्रत्यक्षदर्शी बापू होणे यांनी सांगितले.

कुंड पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी आणि नगर जिल्ह्यातील निघोज या गावांच्या सीमेवर असून निघोज बाजूकडून टाकळी हाजी हद्दीकडे येत असताना निघोज हद्दीत हा प्रकार घडला आहे.वाहत्या पाण्यामुळे शोध घेणे अवघड झाल्याने पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी संपर्क साधला असून सर्वजण पाणी बंद होण्याची वाट पाहत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago