शिक्रापूर (शेरखान शेख): वीज कायदा २०२१ मधील सुधारणा ग्राहक हिताच्या असून नियमित वीज बिल भरणाऱ्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरुर तालुका व तहसील कार्यालय अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्राहक प्रबोधन सप्ताहामध्ये मार्गदर्शन करताना विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन बोलत होते.
यावेळी ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर, शिरुर तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष देवेंद्र जगताप, प्रा. संतोष मासळकर, अशोक मोरे, पंडित मासळकर, अशोक दरेकर, अशोक बेंडभर, अक्षय सोंडेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्टांना कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून घरपोच सेवा तक्रार निवारण व बिल भरणा करुन पावती दिली जाते. तसेच वारंवार खंडित वीज पुरवठ्याने हैराण वीज ग्राहकांसाठी नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण सदैव तत्पर राहील, असे देखील नितीन महाजन यांनी सांगितले.
विद्यार्थी ग्राहकाची दैनंदिन व्यवहारात होणारी फसवणूक टाळावी, लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना दिलेल्या हमीप्रमाणे वस्तू नसेल तर ती बदलून देणे बंधनकारक असून सेल्स अँड गुड्स ऍक्ट कलमानुसार दाद मागता येते, असे ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सातारकर यांनी केले तर प्रास्ताविक शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप केले आणि अशोक मोरे यांनी आभार मानले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…