शिरूर तालुका

कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का बसून सविंदणेतील १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर दि. ९ ( अरुणकुमार मोटे): पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सविंदणे येथील भाऊसाहेब झुंबर भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गणेश हा वडिलांना शेतीच्या कामात नेहमी मदत करत असे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात पाऊस सुरू असताना, जनावरांना पाणी नसल्याने शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करून येतो, असे सांगून गणेश घरातून निघाला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

गणेशचा शोध घेत वडील भाऊसाहेब शेतात गेले. कृषी पंपाजवळ पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला. पंपाच्या विद्युत पेटीजवळ गणेश जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेला होता. पंपाचा विद्युत बॉक्स उघडा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रमेश भोर यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पारगाव कारखाना येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

गणेशला तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. अवघ्या १८ वर्षांच्या होतकरू युवकाचा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सविंदणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भोर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

14 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago