शिरूर तालुका

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका ६० वर्षीय जेष्ठ महिलेला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १) हेमा गोरख गव्हाणे, २) ज्योती राजु पवार, ३) राजु पवार (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बायडाबाई भानुदास पवार (वय ६०) रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे या दि १८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ११:४५ च्या सुमारास मांडवगण फराटा गावात बाजार आणण्यासाठी जात असताना त्या हेमा गोरख गव्हाणे हिच्या दारासमोरुन रस्त्याने जात असताना त्यांना हेमा गव्हाणे व ज्योती राजु पवार यांनी तु दारातुन जाऊ नको असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

तेव्हा फिर्यादी त्यांना मला शिवीगाळ करु नका असे बोलत असताना हेमा गव्हाणे हिने बाजुला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या उजव्या गालावर जोरात मारला. त्यावेळी त्या खाली पडल्या असता त्यांना हेमा गोरख गव्हाणे, ज्योती राजु पवार आणि राजु पवार यांनी पुन्हा हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

 

त्यामुळे बायडाबाई पवार यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे वरील तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार शिंदे हे करत आहेत.

शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago