शिरूर तालुका

वाढदिवसाचा खर्च टाळून शालेय मुलांना साहित्य वाटप…

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विराज आदक याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला असून वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत शाळेमध्ये गरजेच्या मुलांना बसकर चटई देण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जालिंदर आदक यांच्या संकल्पनेतून त्यांचा मुलगा विराज याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना केक, चाॅकलेट वाटण्याऐवजी शाळेसाठी गरजेच्या काही वस्तू भेट देऊन साधेपणात वाढदिवस साजरा करण्यात आला असून आपला वाढदिवस कायमस्वरुपी स्मरणात राहील अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन देखील वर्गशिक्षिका जयश्री विश्वास यांनी मुलांना केले आहे.

थंडीच्या दिवसात खाली फरशी गार पडलेली असल्याने दिवसा सुद्धा थंडीचा अनुभव मुलांना मिळतो. यासाठी बसकर उपयुक्त ठरेल हे लक्षात आल्यानंतर शाळेला काही बसकर भेट देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जयवंत भुजबळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिनीनाथ ढमढेरे, शिक्षक मनोज वाबळे, अंगणवाडी शिक्षिका जोशी मॅडम यांसह आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

8 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

8 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

8 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago