शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील उद्योजक सतिश खंडू नाईकरे यांचा आज (दि 5) रोजी पुणे-नगर महामार्गांवर बोऱ्हाडे मळा येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला.
सतिश नाईकरे यांचा हॉटेल व्यवसाय असुन आज सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरुन आपल्या दुचाकी वरुन एका वेटरला घेऊन ते शिरुरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी एका मालवाहतूक ट्रॅकच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाईकरे यांनी रांजणगाव एमआयडीसी तील एका नामांकित त्यांनी कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी शिरुर परिसरात हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्या निधनाने शिरुर परिसरात शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोलेगाव येथील माळवस्ती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…