शिरूर तालुका

शिरुर अरणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न; पिक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम

न्हावरे (अक्षय टेमगिरे): अरणगाव (ता. शिरुर) खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया आणि पिक व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अरणगाव येथे विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिकांचे उत्पादन वाढविणे, दर्जेदार उत्पन्न मिळविणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीत योग्य नियोजन करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिरुर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील, उपकृषी अधिकारी शिवाजी गोरे, सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अरणगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबा ठोंबरे यांच्या शेतात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यशाळेत बोलताना उपकृषी अधिकारी शिवाजी गोरे यांनी शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. उगवण क्षमता तपासूनच पेरणी केल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळते व उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील यांनी विविध पिकांसाठी बीज प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. खरीप हंगामातील बाजरी, कांदा आणि ऊस लागवडीपूर्वी रासायनिक तसेच जैविक बीज प्रक्रिया कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांचे रोगांपासून संरक्षण होऊन पिकांची वाढ जोमदार होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बदलत्या हवामानाचा विचार करुन एल निनोच्या संभाव्य परिणामांबाबत शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले. उपलब्ध सिंचन सुविधांचा योग्य वापर करून पावसाच्या उपलब्धतेनुसार ऊस लागवड किंवा पेरणीचे नियोजन करावे, असा सल्लाही कृषी अधिकाऱ्यांनी दिला.

सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, बेणे निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच हुमणी नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी विविध पिकांमध्ये बेसल डोसचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबा ठोंबरे, आत्मा समितीचे सदस्य धोंडीबा इंगळे, किसन बेंद्रे, बाबा ठोंबरे, आबा मखर, बाळासाहेब बेंद्रे, संभाजी कोकाटे, बाळू ठोंबरे, आत्माराम ठोंबरे, सिद्धार्थ वडघुले, गणेश शिंगाडे, तुकाराम ठोंबरे, संतोष ठोंबरे, सतीश ठोंबरे, राहुल ठोंबरे, शंकर ठोंबरे, सागर कुलाळ, शिवाजी शिंगटे, अशोक तांबे तसेच शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य कांदा उपादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संभाजी कांडगे दत्तात्रय तरटे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून आगामी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

50 मिनिटे ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

5 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

5 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

5 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

5 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

5 तास ago