महाराष्ट्र

खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…

कोल्हापूर : एक शेतकरी मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले असताना कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने बैलगाडी कालव्यात पडली. या घटनेत दोन्ही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाला आहे. बैलांकडे पाहून मालक ढसाढसा रडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कालव्यात पडून शेतकरी दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. दिलीप खुटाळे हे शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले होते. कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली. बैलांच्या गळ्यात बैलगाडीचे जू असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बूडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

दिलीप खुटाळे हे स्वतः वाचले पण आपल्या या लाडक्या खिल्लारी जोडीला वाचवू शकले नाही. कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांना बोलावून बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कालव्यात गुदमरून बैलांचा मृत्यू झाला होता. दोन्हीही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळावरच रडू कोसळले.

या दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावकरीही हळहळले होते. या गरिब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्याला हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

3 तास ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 तास ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

6 तास ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

1 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

3 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

3 दिवस ago