शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील बस सेवा बंद केल्यास आंदोलनचा इशारा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील नागरीकांसाठी एकमेव पर्याय असणारी PMPL ची बससेवा तोट्यात असल्याने बंद करण्याचा विचार आल्याची माहिती वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी प्रसिद्ध केलेली होती. मात्र सदर बस सेवा बंद केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

केंदूर (ता. शिरुर) सह पुणे जिल्ह्यातील तब्बल २५ बस मार्ग बंद करण्यात येणार असुन त्यामध्ये केंदूर ते वाघोली तसेच भोसरी ते पाबळ यांचा समावेश असल्याने येथील विद्यार्थी व नागरीक चिंतेत पडलेले आहेत. त्यासंदर्भात नुकतेच संबंधित अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी विकास दरेकर, कांताराम नप्ते, अविनाश साकोरे, महेंद्र झेंडे, संतोष दरेकर यांसह आदी उपस्थित होते.

केंदूर, पाबळ तसेच परिसरातील वाड्या वस्त्यांसाठी या दोनच बस सेवा असुन या व्यतीरिक्त कोणतीच सुविधा या भागासाठी उपलब्ध नसून पाबळ येथील जैन मंदिर, मस्तानी कबर तसेच केंदूर येथील संत कान्हेराज, केंद्राई मंदिर यांच्या दर्शनासाठी भावीक येत असतात. तसेच सदर भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी पुणे, वाघोली, भोसरी या भागात शिक्षणासाठी जात असतात.

परंतु बस सेवेच्या या निर्णयामुळे येथील नागरीक संतप्त झालेले असुन करंदी, केंदूर, पाबळ येथील नागरीक आंदोलनाच्या तयारीत आहेत. करंदी ते वाघोली ही बससेवा गेली ७ ते ८ वर्षांपासुन सुरु आहे. ही सेवा मनपा पर्यंत असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी वाघोली पर्यंत केली. त्यामुळे या दोनही बस सेवेचा फेरविचार व्हावा, अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago