शिरूर तालुका

सणसवाडीतून क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन क्रूरपणे गायांची वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले असून राजेश पंडित गायकवाड असे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या चे नाव आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच ४२ ए क्यू १९४९ या पिक अप मधून एक व्यक्ती क्रूरपणे गाया बांधून गायांची वाहतूक करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडी येथे जात सदर पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये दाटीवाटीने 5 गाया बांधल्या असल्याचे तसेच त्यामधील एक गाय मयत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर पिकअप चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे पोलिसांना दिली.

याबाबत पोलीस शिपाई भास्कर महादेव बुधवंत रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राजेश पंडित गायकवाड रा. बोरीपार्थी केडगाव ता. दौंड जि. पुणे या पिकअप चालकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.

महिला पोलीस पाटलांची पोलिसांसोबत भाऊबीज

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago