महिला पोलीस पाटलांची पोलिसांसोबत भाऊबीज

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे प्रत्येक वर्षी पोलिसांना सणाचा आनंद देत भाऊबीज साजरी करत असताना यावर्षी देखील काही महिला पोलीस पाटलांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यां समवेत भाऊबीज साजरी करत सणांपासून लांब राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न करत उत्साहात भाऊबीज सन साजरा केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे करंदीच्या महिला पोलीस पाटील वंदना साबळे व कासारीच्या पोलीस पाटील रुपाली भुजबळ यांच्या वतीने नुकताच भाऊबीज सन साजरा करण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, रणजीत पठारे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, श्रीमंत होनमाने, अमोल चव्हाण, पोलीस नाईक अशोक केदार, भास्कर बुधवंत, विकास मोरे, पोलीस पाटील वंदना साबळे, रुपाली भुजबळ, रिया साबळे, तेजल साबळे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महिलांनी पोलीस स्टेशन येथे येत भाऊबीज साजरी केली असल्यामुळे आम्हाला सणाचा आनंद घेता आला असल्याची प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांनी व्यक्त केली, तर पोलीस कर्मचारी हे 24 तास सेवा बजवित असताना त्यांना कोणतेही सण साजरे करता येत नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भाऊबीज केली असल्याचे पोलीस पाटील वंदना साबळे यांनी सांगितले. दरम्यान पोलीस हावलदार संदीप कारंडे यांनी आभार मानले.

तळेगाव ढमढेरेत प्रशासन सुट्टीवर तर पुढारी बांधकामावर