शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची माहिती
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जातेगाव बुद्रुक येथील एका विद्यालयाच्या समोर गोंधळ घालून भांडणे करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेता गुन्हे दाखल केलेले असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयच्या परिसरात पोलिसांची करडी नजर असून गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना जातेगाव येथील कॉलेज समोर शालेय युवकांच्या दोन गटात हाणामारी चाललेली असताना पोलिसांनी तेथील युवकांना त्यात घेत 6 युवकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्रापूर येथील एका शाळे समोर गोंधळ घालणाऱ्या युवकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणले त्याबाबत बोलताना पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. पोलिसांच्या गस्ती दरम्यान कोठेही कॉलेज समोर युवकांकडून गैरकृत्य होत असेल, गोंधळ घातला जात असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई दरम्यान कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून कोणालाही पाठबळ दिले जाणार नाही, शालेय मुलांनी शाळेत जात असताना शाळेमध्ये शिक्षणावर भर देणे गरजेचे असून किरकोळ वादातून कोठेही शाळा, महाविद्यालय परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये, शालेय जीवनात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास पुढे खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे शालेय युवकांनी शिक्षणावर भर देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…