रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने संकष्ठी चतुर्थीचे औचित्य साधून पहाटे च्या सुमारास अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी दर्शानास खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
शनिवार (दि १६) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक, तसेच १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. संकष्टी चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी श्री नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबाणीस संतोष रणपिसे पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…