शिरूर तालुका

शिक्रापूर पाबळ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

स्थानिक प्रशासन व पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे दुर्लक्ष

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून शिक्रापूर पाबळ रस्त्याने जाणारा बेल्हा जेजुरी महामार्ग रस्ता नव्याने बनवण्यात आलेला असून सध्या सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने सदर रस्त्यांवर कोठेही गरीरोधक नाही तसेच अनेक धोकादायक ठिकाणे दर्शवणाऱ्या फलकांसह गाव, शाळा दाखवणारे फलक देखील येथे नाही. मात्र सध्या रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने येथून वाहने भरधाव वेगाने जात असतात तर अनेक जण पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्यांचा वापर करत असतात.

सदर परिसरात शेतीचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांची वाहने तसेच जनावरे सुद्धा या रस्त्याने ये जा करत असतात. मात्र या महामार्गाच्या कडेला जातेगाव बुद्रुक, मुखई, धामारी, पाबळ हि गावे असून रस्त्यांच्या कडेलाच शाळा, महाविद्यालय, बाजार, बँका आहेत. परंतु बेल्हा जेजुरी महामार्गावर कोठेही गतिरोधक नसल्याने रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होऊन काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

अनेकदा वाहने उलटून वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन देखील उलटली आहेत. अलीकडील काळात एका महिन्यात 10 ते 15 अपघात शिक्रापूर ते पाबळ पर्यंत होत आहेत. अनेकदा काही जनावरांचा देखील अपघात झालेला असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अनेक अपघात होत असताना देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून रस्त्यावर दुभाजके बसवण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

जिल्हा परिषद ईच्छुकांच्या आंदोलनाचे काय?

सदर रस्त्याच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका पदाधिकाऱ्याने मागील महिन्यात सदर रस्त्यावर दुभाजक बसवण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन देखील झाले नाही आणि अद्याप दुभाजक देखील बसले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद ईच्छुकांच्या आंदोलनाचे काय झाले, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

17 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

17 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

17 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

17 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

17 तास ago