शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी जळगाव येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तिघांनी सहभाग घेत एका खेळाडूने रौप्य पदक मिळवले असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे ॲड. निखिल गिरमकर यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी शालेय तायक्वांदो कराटे स्पर्धेतून विभाग स्तरातून राज्य स्तरापर्यंत मजल मारली होती, यामध्ये अनिकेत संतोष चौगुले, अमन राजू धायत व जितेंद्र रामकिशोर धायत यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये खेळाडूंनी उत्तम खेळ करत अनिकेत संतोष चौगुले याने १४ वर्षे आतील गटात रौप्यपदक पटकावले आहे.
या खेळाडूंना आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे ॲड. निखिल गिरमकर, स्वप्निल भिसे, संग्राम आजबे, रंजीत झा यांनी मार्गदर्शन केले. तर सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे सरपंच रमेश गडदे, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार अनिल जगताप, डॉ. सुभाष लेव्हकर, सोमानाथ सायकर, सागर सायकर व वंदना बराटे यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…