शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुकानफोडी करून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरातील दुकान फोडून दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले सुमारे १ लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. डायल ११२ पथकाची सतर्कता, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी ठेवलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करून नेले होते.तपासादरम्यान मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव (वय २५) याने संतोष बालाजी लोहार (वय २४) आणि वैभव अशोक घुमरे (वय २१) यांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.

तांत्रिक तपासाद्वारे आरोपी सणसवाडी येथील एल अँड टी फाट्याजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिघांनाही अटक केली. २९ जून रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पोलीस चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेले सर्व १० इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रीक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि किरण बडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. डी. मळेकर करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दुचाकीचोर; चार चोरीच्या मोटारसायकली जप्त

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago