कान्हूर मेसाई मध्ये आढावा बैठकीचे आयोजन
पाबळ (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई मध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत पंचायत समिती पदासाठी कान्हूर गावात बुधवारी (ता. ५) मेसाई मंदिरामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते.
रांजणगाव कारेगाव जि.परिषद,पंचायत समिती गटातून कान्हूर गावातून पंचायत समितीसाठी एक उमदेवार देण्यासाठी गावाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गावातून तीन उमेदवार इच्छुक झाले, त्यामध्ये राष्ट्रवादी सरचिटणीस बबन शिंदे, किसान सेल अध्यक्ष सुधीर पुंडे, मा. सरपंच दिपक तळोले यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले. इच्छुक असणाऱ्या तिघांनी आपली मते मांडली. परंतु, गावातील तरुण युवकांनी व ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तरुण युवाकांनी शेतीसाठी पाणी प्रश्न हा मुद्दा जास्त प्रमाणात लावून धरला, जे पाण्यासाठी ठोस भूमिका घेईतील त्यांना आम्ही मतदान करू नाहीतर मतदान करणार नाही, असा पवित्रा कान्हूर मेसाई मधील युवकांनी घेतला. लोकसभेच्या वेळेला पण युवकांनी एकत्र दाखवून मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्याचा फटका लोकसभाच्या नेत्यांना बसला होता. तसेच या निवडणुकीत जे उमेदवार गावासाठी पाणी प्रश्न सोडवतील गाव त्याच्या पाठीमागे उभे राहील, असे आश्वासन ग्रामस्थानी दिले.
शिरूर तालुक्यातील काही गावांत कालव्याद्वारे डिंभे धरण, चासकमान धरणाचे पाणी पोहचले असल्याने पिके हिरवीगार पाहायला मिळतात. तर दुसरीकडे पश्चिम भागातील पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, धामारी, डफळापूर, खैरेनगर, वरुडे, खैरेवाडी, चिंचोली मोराची, शास्ताबाद, हिवरे (मांदळेवाडी) परिसरातील गावांना जवळपास दरवर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो. गेल्या २०-२५ वर्षांत अनेक आंदोलन, मोर्चे, उपोषण झाली. लोकप्रतिनिधींनी आश्वासनांचा पाऊस पाडला. सर्वेक्षण व बैठका झाल्या. मात्र, पाणी प्रश्न अद्याप सुटला नाही, असे आढावा बैठकीत बोलून दाखवले.
यावेळी गावांमधील आजी, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक गावांतील नागरिकांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या. कान्हूर गावातील जनता आता कोणत्या उमेदऱ्याला कौल देणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर
Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले
Video; रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील उज्जैन यात्रेच्या बसवर अज्ञातांकडुन दगडफेक
शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके