nirmala-navale
शिरूर : सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले आहे.
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
निर्मला नवले या सोशल मीडियावर लोकप्रिय असून, त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. मात्र, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना पराभूत केले आहे. निर्मला नवले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. पण, निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण 299 जागांपैकी 73 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे 20, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, ठाकरे गटाचे 2 आणि शरद पवार गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.
महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही
रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…