शिरूर तालुका

शिरुर; खासदार लंके यांच्या बहिणीने गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करत जपला सामाजिक वसा

शिरुर (तेजस फडके) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे खासदार निलेश लंके यांच्या परोपकारी व सामाजिक कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत खासदार लंके यांच्या ज्येष्ठ भगिनी वंदना सतीश गंधाक्ते यांनी त्यांचा नातु कु निल श्रीकांत गंधाक्ते याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार (दि २८) रोजी शिरुर नगरपरिषदेच्या सेंटर शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटत करत सामाजिक कार्याचा वसा जपत आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा केला .

 

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले खासदार लंके यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक व शासकीय मदत पोहोचवीण्याचा नेहमीच असणारा प्रयत्न पाहता सध्या अनेक सामाजिक संस्था खासदार लंके यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्य करताना दिसत आहेत.

 

त्यामुळेच स्वतःच्या भावाच्या पाऊलावर पाऊल टाकत खासदार निलेश लंके यांच्या जेष्ठ भगिनी वंदना गंधाक्ते यांनी त्यांचा नातु कु निल गंधाक्ते याचा वाढदिवस शिरुर नगरपरिदेच्या सेंटर शाळेत साजरा केला. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना राणी लंके यांनी आपल्या खासदार पतीचे उदाहरण देत सांगितले की, बुके,शाल या सारख्या किमती वस्तू विकत घेऊन सत्कार करण्यापेक्षा तसेच आपल्या लाडक्या मुला-मुलींचा वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत तो खर्च सामान्य जनतेसाठी वापरला. तर तो वाढदिवस असो की इतर कुठलेही शुभकार्य असो ते समाधानकारक ठरते. सत्काराच्या रकमेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले तर त्याचा उपयोग गरजु मुलांना निश्चित चांगला होईल.

 

यावेळी वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या समारंभामुळे शाळेतील चिमुकली मुलेही भारावून गेली. ‘दातृत्व हे रक्तातच असावे लागते’ या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या वंदना गंधाक्ते यांनी त्यांचा नातू कु निल याच्या वाढदिवसानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत एक आगळावेगळा उपक्रम राबवत सामाजिक संदेश दिला आहे .

 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, सामाजिक कार्यकर्त्या वंदना गंधाक्ते, रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, छाया गंधाक्ते, शोभना पाचंगे, सुनीता घावटे, राणी शिंदे, सुरेखा कौठावळे, ऐश्वर्या ढोरसकर, प्रांजल गंधाक्ते, किशोरी गावडे, डॉ वैशाली साखरे, सतिष गंधाक्ते ,विनोद घावटे, श्रीकांत गंधाक्ते, प्रशांत रत्नपारखी, किसन कौठावळे, प्रणय गंधाक्ते, दादा पठारे,गावडे गुरुजी तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राणी कर्डिले यांनी तर आभार शाळेच्या शिक्षिका धुमाळ यांनी मानले.

शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे दुध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शिवबा संघटनेचा आक्रमक पवित्रा

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago