शिरूर तालुका

शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके) स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण राज्यात 1 जुलै ला कृषि दिन साजरा केला जातो. शिरुर येथे पंचायत समिती शिरुर व तालुका कृषी अधिकारी शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर पंचायत समिती येथे संपन्न झाला कार्यक्रमात बांबु लागवड व रेशीम उद्योग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले

 

खरीप हंगामात हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावणे, बियाण्यास बीज प्रक्रिया बियाणे उगवण क्षमता तपासणी चाचणी घेणे, ऊस मुग बाजरी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक करुन दाखवणे रुंद सरी वरंबा पध्दतीनेच पेरणी करुन घेणे व तंत्रज्ञानचा प्रचार व प्रसार करणे अशी अनेक कामे प्रभावीपणे पार पाडल्याने कृषी सहायक जयवंत भगत यांना प्रशस्तीपत्र देऊन गटविकास अधिकारी ढोके तसेच तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे कृषी अधिकारी अमित रणवरे राम जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

त्यांच्या समवेत शिक्रापुरचे कृषी सहायक अशोक जाधव, पाबळच्या कृषी सहायक जयश्री रासकर, दिपक कोंडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या वतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बाभुळसरचे रामचंद्र नागवडे, भिमराव गाजरे यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच पिक स्पर्धेत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व विभाग स्तरावर ज्यांनी बक्षिसे मिळविले अशा शेतकऱ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.

 

कृषी सहायक जयवंत भगत हे कसलेही वेळेचे बंधन न पाळता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन त्यांना सेवा देतात. तसेच सरकारी सुट्टी न बघता शेतकऱ्यांच्या सोईने सेवा देणारा कर्मचारी म्हणून भगत यांच्याकडे बघितल जात. त्यामुळे जयवंत भगत यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती मिळाली अशा स्वरुपाच्या अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी

शिरुर येथील रामलिंग तसेच देव्हडेश्वर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago