शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) तर्डोबाची वाडी (ता. शिरुर) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाचर्णे यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. सुरेश पाचर्णे यांचे वडील ठकाजी आणि आई कलाबाई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. पंढरपुरच्या पांडुरंगावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. आषाढी वारी काळात ते पंढरपुरला दर्शनासाठी जायचे.

 

त्यामुळे आषाढी वारी सुरु झाल्याने सुरेश पाचर्णे यांनी पंढरपुर येथे जाऊन १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी पंढरपुर देवस्थान समितीकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव गिरमकर, सरदवाडी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गौतम घावटे, सामाजिक कार्यकर्ते गोरख घावटे आदी उपस्थित होते. या देणगी नंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पाचर्णे यांना तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी ची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

शिरुर येथील रामलिंग तसेच देव्हडेश्वर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई