शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील प्रभुश्री रामलिंग तसेच श्री देवडेश्वर संत शिरोमणी निळोबाराय पालखी व आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यात बुधवार (दि ३) रोजी रामलिंगसह परिसरातील महिलांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पायी दिंडी सोहळ्याचे हे १२ वे वर्षे असल्याचे पालखी व पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर यांनी सांगितले.
या पायी दिंडी प्रस्थानाच्या वेळी अतिशय आनंदमय असे वातावरण तयार झाले होते. यात मोठया संख्येने आसपासच्या महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिला टाळ वाजवत भजनात दंग झाल्या होत्या. तसेच अनेक महिला तुळस डोक्यावर घेऊन या दिंडीत सहभागी झाल्या होत्या. टाळ, मृदंगाच्या तालावर यावेळी महिलांनी फुगड्या खेळल्या. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. विशेष म्हणजे अनेक महिलांनी मराठमोळी नववारी साडी परीधान करुन स्वतः पालखीला खांद्या दिला.
रामलिंग मंदिर येथुन या पायी दिंडीचे प्रस्थान झाले असुन सर्वांच्या सहकार्यामुळे पायी दिंडी प्रस्थान सोहळा मोठया उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, युवती शहरध्यक्षा गीता आढाव, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी जाधव, रोहिणी रासकर, आरती चव्हाण, काजल चव्हाण, सुपेकर तसेच अनेक महिलांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.
शिरुर तालुक्यात भाषणबाजीत महिला आघाडीवर; महिलांच्या शुभाशिर्वादाने एक आगळावेगळा शुभविवाह संपन्न