shirur-police-mock-drill
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हातळण्याबाबत पोलिस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील रंगीत तालीम शिरूर बसस्थानका समोर करण्यात आली.
शिरुरच्या बसस्थानका समोर आज (बुधवार) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक काही जणांच्या जमाव रस्त्यावर उतरतो. रस्त्या अडवतो. दोन गटात अपघातावरुन वाद होतो आणि हे दोन्ही गट आपआपसात भिडतात. एकमेकांवर दगड फिरकावितात आणि पोलिसाच्या ताफा सायरनच्या आवाज करीत दाखल होतो. सुचना आणि अश्रुधूराचा वापर करीत पोलिस दंगल सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणतात. जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले जाते आणि रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळित होते.
तुम्हाला सर्वाना क्षणभर वाटले असेल शहरात उसळलेल्या दंगलीचे हे चित्र आहे. हे खरे आहे की हे दंगलीचे वर्णन आहे पण खराखु-या दंगलीचे नाही तर दंगल सदृश्य परिस्थितीचे हे वर्णन आहे. शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हातळण्याबाबत पोलिस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील रंगीत तालीम शिरूर बसस्थानकासमोर करण्यात आली. यात पोलिस ऊपविभागीय आधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या सह अन्य सहा पोलिस आधिकारी, ३० पोलिस, ९ महिला पोलिस, ९ प्रविष्ट पोलिस यांच्या सह १० गृहरक्षकदलाचे जवान आदीनी सहभाग घेतला. दोन रुग्णवाहिकांसह आग आटोक्यात आणण्याचा बंब आदी यात सहभागी झाले होते. त्याखेरीज ठिकठिकाणी चेकपोस्ट नाके करुन तिथे पोलिस तैनात करण्यात आले होते.
दंगल झालेल्या ठिकाणी पोलिसांचे आगमन, रुग्णवाहिका, अग्निशामक दल याचे दाखल होणे, जखमींना रुग्णालयात दाखल करणे, दंगेखोराना पकडून पोलिस व्हॅन मधून पोलिस स्टेशनला रवाना करणे, जमावाला काबूत आणण्यासाठी अश्रूधूरचा वापर याबाबतच्या तयारीची रंगीत तालीम यावेळी करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक यशवंत गवारी व पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले की, गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्शवभुमीवर पोलिस बंदोबस्त व अन्य शासकिय यंत्रणायांच्यातील समन्वयातील तयारीची रंगीत तालीम आजच्या डेपो द्ववारे करण्यात आली.
शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…
शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…
शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…