sugandhabai-kamble-washim
वाशिम: वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे (वय 62) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आल्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
सुगंधाबाई कांबळे या तीन वर्षांपासून वारा जहागीर ग्रामपंचायत सरपंचपदी कार्यरत आहेत. त्यांनी निर्विवाद सरपंच पद सांभाळले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासात्मक कामे झाली आहेत. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. २०) दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
दरम्यान, सूगंधाबाई कांबळे यांचे पती पूंजाजी कांबळे यांचाही मृत्यू वीज पडून तीन वर्षापूर्वी झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी शरद राठोड करीत आहेत.
राजकारण! पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचाचे केले अपहरण; कारण…
सरपंचपद नडले! सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत सदस्याचा मृत्यू…
माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…
उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…
राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…