shirur-police-mobile

शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना मोबाईल परत…

क्राईम

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी आत्तापर्यंत ३० मोबाईल केले मुळ मालकांना सुपुर्त
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना त्यांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले ३० मोबाईल परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

मोबाईल गहाळ, हरवल्याच्या, चोरी गेल्याच्या तक्रारी नागरिकांकडून शिरूर पोलिस स्टेशनला वेळोवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपास करत २० मोबाईल हस्तगत केल्यानंतर पुन्हा एकदा गहाळ, चोरीला गेलेले मोबाईल वापरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून १० मोबाईल पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी शोधून काढून रक्षाबंधनच्या दिवशी नागरिकांना परत केले आहे. त्यामुळे पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर त्यांच्या या कामगिरी बद्दल शिरूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी अक्कलकोट, बीड, चाकण, पुणे, सांगली, या परीसरात मोबाईल वापरणाऱ्यांचा शोध घेऊन गहाळ झालेले मोबाईल मुळ नागरीकांना परत मिळवून दिले आहेत. पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सोनाजी तावरे यांनी ही कामगिरी केली आहे.

शिरूर पोलिस स्टेशन आवारातील २२० वाहने मिळणार मालकांना…

शिरूर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटर सायकल चोरांना ठोकल्या बेडया…

कृषी पंप व केबल चोरी करणारी टोळी शिरूर पोलिसांनी केली गजाआड…

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर पोलिसांनी मोटार चालकाकडून तब्बल २४ हजारांचा दंड केला वसूल…